Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा गाजवणाऱ्या कोण आहेत ज्योती वाघमारे ?

Rashmi Mane

ज्योती वाघमारे

दसरा आणि शिवसेनेचा मेळावा हे एक समीकरण आहे. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन वेगवगळे मेळावे सुरू झाले.

Jyoti Waghmare | Sarkarnama

दसरा मेळावा

यंदाही ठाकरे गटाचा मेळावा हा शिवतीर्थावर, तर शिंदेंचा मेळावा आझाद मैदानावर पार पडला. या वर्षीच्या दसरा मेळाव्यात वरचढ ठरल्या ज्योती वाघमारे, ज्यांनी शिंदेंचा दसरा मेळावा चांगलाच गाजवला.

Jyoti Waghmare | Sarkarnama

चळवळीत काम करणाऱ्या नेता

आंबेडकरी चळवळीत काम करणारा चेहरा म्हणून डॉ. ज्योती वाघमारे ओळखल्या जातात. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते,

Jyoti Waghmare | Sarkarnama

सामाजिक चळवळीच्या माध्यमातून

ज्योती वाघमारे यांनी मानवी हक्क अभियान, विद्रोही संस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीच्या माध्यमांतून कार्य सुरू केले आहे.  

Jyoti Waghmare | Sarkarnama

समाजकार्य

२००२ ते २००४ दरम्यान प्रणिती शिंदे यांच्या जाई-जुई प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी काही काळ समाजकार्य केले.

Jyoti Waghmare | Sarkarnama

तडफदार वक्त्या

अल्पावधीतच त्या तडफदार वक्त्या म्हणून परिचित झाल्या. त्या वालचंद कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. मराठीवर प्रभुत्व असल्याने वक्तृत्वाने त्यांनी मंच गाजवले आहेत.

Jyoti Waghmare | Sarkarnama

2014 ला काँग्रेस पक्षात प्रवेश

ज्योती वाघमारे यांनी 2014 मध्ये सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केले, पण त्यानंतर त्या काही काळ सक्रिय राजकारणापासून अलिप्त झाल्या होत्या.

Jyoti Waghmare | Sarkarnama

शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

Next : 'आयपीएस' कृष्ण प्रकाश यांचा 'आयर्नमॅन' पर्यंतचा प्रवास ?

येथे क्लिक करा