Pradeep Pendhare
एकनाथ शिंदे यांनी 1980 च्या दशकात शिवसेनेत प्रवेश करत, ठाण्यात शाखाप्रमुख म्हणून काम केले. आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय कारकीर्द घडली.
1997 रोजी ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवड झाली. यातून स्थानिक राजकारणात स्वतःची ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली.
ठाणे विधानसभा मतदारसंघातून 2004 रोजी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग विधानसभा निवडणुका जिंकत राजकीय प्रभाव वाढवला.
2014 मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काही काळ सांभाळली. त्यानंतर भाजप-शिवसेना सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळाले.
शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी आली.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात जून 2022 मध्ये बंड केले. एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना सोबत घेत मविआच्या सरकारमधून बाहेर पडले. राज्यात सत्तांतर घडले.
एकनाथ शिंदे 30 जून 2022 भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे शिवसेना फेब्रुवारी 2023 मध्ये नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दिले. त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वाच्या लढाईला महत्त्वाचे वळण मिळाले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 2024 विधानसभा निवडणुकीत 81 जागांपैकी 57 जागांवर विजय मिळवला. महायुतीच्या सत्तेत शिंदे यांची भूमिका अधोरेखित झाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भाजपसोबत विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मतभेद उघड झाले. उमेदवारी, जागावाटप आणि परस्पर सहकार्यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये विसंवादातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.