Vasant More : वसंत मोरेंची राज ठाकरेंसाठी इमोशनल पोस्ट अन् खास कॅप्शनही

Aslam Shanedivan

सत्याचा मोर्चा

नुकताच मुंबईत सत्याचा मोर्चा पार पडला. या मोर्चात मनसे आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष सहभागी झाले होते.

Raj Thackeray And Vasant More | Sarkarnama

राज ठाकरे

या मोर्चाच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर दिसले. यामुळे याची वेगळी चर्चा सुरू झाली आहे.

Raj Thackeray And Vasant More | Sarkarnama

निवडणूक आयोग

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध दंड थोपटत, आधी मतदार याद्या दुरूस्त करा नंतरच निवडणूक घ्या अशी मागणी केली आहे.

Raj Thackeray And Vasant More | Sarkarnama

वसंत मोरे

या मोर्चाची सध्या चर्चा सुरू असतानाच आता पुण्याचे डँशिंग नेते वसंत मोरे यांनी केलेल्या एका पोस्टचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

Raj Thackeray And Vasant More | Sarkarnama

मनसेला जय महाराष्ट्र

वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र करत वंचितमध्ये प्रवेश केला होता. तर विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन हाती बांधले होते.

Raj Thackeray And Vasant More | Sarkarnama

राज ठाकरे यांचे भाषण

या राजकीय प्रवासानंतरही वसंत मोरे अजूनही राज ठाकरेंना विसरले नसल्याचे त्यांच्या या पोस्टमधून समोर येत आहे. राज ठाकरे यांनी मोर्चात केलेल्या भाषावेळी वसंत मोरे खाली बसून त्यांचे भाषण ऐकत होते.

Raj Thackeray And Vasant More | Sarkarnama

'आज तब्बल 571 दिवसानंतर…'

यावेळी वसंत मोरेच्या कार्यकर्त्याने एक फोटो काढला. तो फोटो वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत'आज तब्बल 571 दिवसानंतर…' अशी खास कॅप्शन देत राज ठाकरेंबद्दलचा त्यांचा स्नेहभाव दाखवला आहे.

Raj Thackeray And Vasant More | Sarkarnama

वसंत मोरे-राज ठाकरे यांची भेट

दरम्यान, आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे झालेले मनोमिलनाच्या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीवेळी वसंत मोरे हे राज ठाकरे यांची भेट घेणार का? ते पुण्यात प्रचाराच्या दरम्यान आमने सामने येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Raj Thackeray And Vasant More | Sarkarnama

क्रिकेट मैदानावरून थेट राजकारणात! मोहम्मद अझहरूद्दीनच नव्हे तर 'या' क्रिकेटपटूंनीही भूषवलंय मंत्रिपद

आणखी