Iltija Mufti : मेहबूबा मुफ्तींच्या मुलीची राजकारणात 'एन्ट्री' ; जाणून घ्या कोण आहे इल्तिजा मुफ्ती ?

Rashmi Mane

राजकारणात एन्ट्री

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्तींची राजकारणात एन्ट्री झाली आहे.

Iltija Mufti | Sarkarnama

मीडिया सल्लागार

पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी इल्तिजा यांची 'मीडिया सल्लागार' म्हणून नियुक्ती केली आहे.

Iltija Mufti | Sarkarnama

सोशल मीडिया

इल्तिजा मुफ्ती यांनी गेली चार वर्ष त्यांच्या आईचे सोशल मीडिया अकांऊट सांभाळत होत्या.

Iltija Mufti | Sarkarnama

राजकारणात कार्यरत

इल्तिजा या मेहबूबा मुफ्ती यांच्या सोशल मीडियाच्या प्रभारी तसेच 2019 पासून राजकारणात सक्रिय आहेत.

Iltija Mufti | Sarkarnama

भारत जोडो यात्रा

राहुल गांधींनी आयोजित केलेल्या 'भारत जोडो यात्रे'मध्येही इल्तिजा मुफ्ती सहभागी झाल्या होत्या.

Iltija Mufti | Sarkarnama

जोरदार टीकेमुळे चर्चेत

जन्मू- काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती तुरुंगात गेल्या तेव्हा त्यांनी या निर्णया विरूद्ध जोरदार टीका केली होती त्यावेळी इल्तिजा मुफ्ती चर्चेत आल्या होत्या.

Iltija Mufti | Sarkarnama

सक्रिय राजकारणात प्रवेश केल्याची चर्चा

इल्तिजा मुफ्ती नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या सक्रिय राजकारणात एन्ट्री झाल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

Iltija Mufti | Sarkarnama

Next : 'बॉलिवूड' अभिनेत्यांपेक्षा कमी नाही, देशातील या 10 नेत्यांची लोकप्रियता