सरकारनामा ब्यूरो
कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या विचार करता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने PFO संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये सोप्या पध्दतीने अकाउंट ट्रान्सफर करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
यासाठी एक परिपत्रक जाहीर करण्यात आले असून यानुसार आता कर्माचाऱ्यांना PF अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता लागणार नाही.
तर त्यासाठी त्यांना फक्त काही प्रोसेस कराव्या लागणार आहेत.
यात EPFO च्या वेबसाइटवर जाऊन UAN लॉगिन क्रेडेन्शियल्समध्ये EPF च्या खात्यात पीएफधारकाला लॉगिन करायचं आहे.यानंतर 'मॅनेज' मेनूमधील KYC पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यात पीएफधारका आधार ऑपशन्सवर जाऊन त्यांच्या आधारसंदर्भातील माहिती भरु शकणाार आहेत.
अशाप्रकारे KYC पूर्ण करुन झाल्यानंतर आधार ईपीएफ खात्याला जोडले जाणार आहे.
Universal Account Number (UAN) मध्ये खाते ट्रन्सफर करत असताना हा नंबर आधारसोबत जोडलेला असणे आवश्यक आहे. तसेच यात धारकाचे वैयक्तीक माहिती योग्य असायला हवा.
ज्या कर्मचाऱ्यांचे UAN (01/10/2017 नंतर दिलेले UAN) असा नंबर असलेला आणि आधार क्रमांकाशी UAN जोडलेला असणार आहे त्यांनांच यांचा फायदा होणार आहे.