Ajit Pawar : बंड करून देखील अजित पवार आहेत प्रचंड लोकप्रिय ! कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास

Rashmi Mane

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते

अजित पवार यांचे नाव महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये गणले जाते.

Ajit Pawar | Sarkarnama

राजकीय बंड

आता मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बाजू सोडून अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत.

Ajit Pawar | Sarkarnama

पाच वेळा उपमुख्यमंत्री

अजित पवारांनी महाराष्ट्राचे पाच वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

शिक्षण

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूल बारामती येथून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. शालेय शिक्षणानंतर अजित पवार काकांसोबत राजकारणात आले.

Ajit Pawar | Sarkarnama

80 दशकात राजकारणाला सुरुवात

80 च्या दशकात अजित पवार यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. 1982 मध्ये पुण्यातील साखर सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर निवडून आले.

Ajit Pawar | Sarkarnama

पहिल्यांदा खासदार

1991मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेचे खासदारही झाले. नंतर त्यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ लोकसभेची जागा सोडली. त्यानंतर ते बारामती विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवडून आले.

Ajit Pawar | Sarkarnama

7 वेळा आमदार

1995 पासून 2019 पर्यंत सलग 7 वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.

Ajit Pawar | Sarkarnama

अनेक पदं भूषवली आहेत

अजित पवारांनी आतापर्यंत शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांमध्ये आपली भूमिका पार पाडली आहे. मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते अशी पदं अजित पवारांनी भूषवली आहेत.

Ajit Pawar | Sarkarnama

Next : अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांची राजकारणात एन्ट्री ?

येथे क्लिक करा