Rajanand More
पंजाबचे निवृत्त डीजीपी मोहम्मद मुस्तफा आणि माजी मंत्री काँग्रेस नेत्या रझिया सुलताना यांचा एकुलता एक मुलगा अकील अख्तर याचा मागील आठवड्यात संशयास्पद मृत्यू झाला आहे.
मुलाच्या मृत्यूप्रकरणी आई-वडिलांसह बहिण व तिच्या पतीवर पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. हत्येचे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
मुलाचा ड्रग्जच्या अति सेवनामुळे मृत्यू झाल्याचा दावा अकीलच्या आई-वडिलांनी केला आहे. त्या घरातच मृतावस्थेत आढळून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अकीलचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले. आपल्या मृत्यूला कुटुंबातील सर्वजण जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे.
आपल्या पत्नीसोबत वडिलांचे अफेअर सुरू असल्याचा खळबळजनक आरोपही त्याने केला आहे. आपल्या मारण्याचा किंवा अडकविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्याने केला आहे.
मुलाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोहम्मद मुस्तफा, रझिया सुलताना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे.
रझिया सुलताना या काँग्रेसच्या पंजाबमधील वजनदार मुस्लिम नेत्या मानल्या जातात. त्या माजी मंत्री असून मालेरकोटा मतदारसंघातून तीनदा विधानसभेत गेल्या आहेत. प्रदेश काँग्रेसच्या त्या उपाध्यक्षाही होत्या.
राजकीय आकसातून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगत त्यांनी रझिया सुलताना यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.