Mangesh Mahale
शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रति शिर्डी शिरगाव चे मुख्य विश्वस्त प्रकाश देवळे यांचे मंगळवारी निधन झाले.
शिवसेनेतर्फे १९९६ मध्ये विलासराव देशमुख यांचा पराभव करून विधान परिषदेवर निवडून गेले.
शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. ते चित्रपट क्षेत्रातही कार्यरत होते.
'मायेची सावली' या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती.
डेस्टिनी प्रॉडक्शन निर्मित अनटोल्ड स्टोरी:मिशन इंडिया या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती.
या चित्रपटासाठी देवळे यांनी पटकथा,संवादलेखन केले होते.
शिरगाव येथील प्रति शिर्डी साईबाबा मंदिर येथे या चित्रपटाचा मुहूर्त झाला होता.