Rashmi Mane
पहिल्या प्रयत्नात अपयश येऊनही मेहनतीच्या बळावर एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली आणि 'डीवायएसपी' हे पद मिळवले. जाणून घेणार आहोत डॉ. सई भोरे पाटील यांच्या बद्दल.
सांगाव मौजे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे प्राथमिक शिक्षण घेतले. कोल्हापूर मधील विवेकानंद कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या सई यांनी बारावीनंतर 'बीएचएमएस' ही पदवी घेतली.
ग्रेजुएशन झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी केली.
पहिल्यांदा परिक्षा दिली परंतू फक्त सहा गुणांनी परिक्षेत अपयश आले. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर 2015 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले अणि 'डीवायएसपी' झाल्या.
महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे त्यांनी ट्रेनींग घेतलं आहे. प्रोबेशनवर कोल्हापूरमध्ये होत्या. त्यांचं पहिलं पोस्टिंग पुणे ग्रामीण येथील हवेली डिव्हीजन येथे झाले.
तुळजापूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या.
डॉ. सई भोरे पाटील यांची नुकतीच अकलूजच्या 'डीवायएसपी' पदी नेमणूक झाली आहे.