सरकारनामा ब्यूरो
केंद्र सरकार शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक’ योजनेंतर्गत 'फार्मर आयडी' देणार आहे.
ॲग्रीस्टॅक’ योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 लाखाहून आधिक शेतकरी जोडले गेलेले आहेत. फार्मर आयडी लवकर तयार करावे असे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी सांगितले आहे.
'फार्मर आयडी’वरती शेतकऱ्यांसाठी एक युनिक आयडी नंबर असणार आहे. हा नंबर शेतकऱ्यांच्या डिजिटल प्रोफाइलशी जोडला जाणार आहे.
फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत मिळणारी मदत तातडीने मिळण्यास मदत होईल.
पीक कर्ज मिळवण्यासाठी आणि शेतीविकासासाठी अन्य कर्जे उपलब्ध करून घेण्यामध्ये मदत होणार आहे.
ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी यासाठी सर्व महा ई सेवा केंद्रे, तलाठ्यांनी घरोघरी जाऊन नोंदणीसाठी शिबिर घेतल्या आहेत.
मोबाईलवरून सेल्फ रजिस्ट्रेशन माध्यमातूनही आयडी तयार करता येणार आहे.