Sunil Balasaheb Dhumal
मुंडे यांचा जन्म महाराष्ट्रातील परळी येथे १२ डिसेंबर १९४९ रोजी शेतकरी कुटंबात झाला.
गावातील शाळेतच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. अंबेजोगाई येथील महाविद्यालयातून बी.कॉमनंतर त्यांनी पुण्यातील 'आयएलएस' महाविद्यालयात शिक्षण घेतले.
कॉलेजमध्येच ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे ओढले गेले. तेथे त्यांना प्रमोद महाजन भेटले. तेथूनच मुंडे राजकारणात उतरले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनात भाग घेतला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही डझन शाखा सांभाळत ते संभाजीनगर मंडळ कार्यवाह बनले. भाजपमध्ये मुंडे भाजपच्या युवा शाखा महाराष्ट्र युनिट अध्यक्ष होते.
1994 मध्ये मुंडे यांनी महाराष्ट्रातील शरद पवार सरकारच्या अपयशाचा पर्दाफाश करण्यासाठी राज्यव्यापी यात्रा काढली होती. त्यावेळी ते प्रकाश झोतात आले.
12 डिसेंबर 1991 ते 14 मार्च 1995 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.
1995 मध्ये स्थापन झालेल्या मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते.
मुंडेंनी पुन्हा 2014 मध्ये बीड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी ग्रामीण विकास मंत्री म्हणून शपथ घेतली.
3 जून 2014 रोजी पहाटे दिल्लीत मुंडे यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यावेळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.