Rashmi Mane
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) खासगी वाहनधारकांसाठी सुरू केलेल्या वार्षिक फास्टॅग पास योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
अवघ्या आठ दिवसांत 5 लाखांहून अधिक लोकांनी फास्टॅग वार्षिक पास खरेदी केला, त्यामुळे शासनाला तब्बल 150 कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
एनएचएआयने खासगी वाहनधारकांसाठी 3,000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग टोल पास उपलब्ध करून दिला.
सर्वाधिक पास खरेदीत देशातील तमिळनाडू त्यानंतर कर्नाटक व हरियाना या राज्याचा समावेश आहे. तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात सर्वाधिक व्यवहार होत आहेत.
राज्यातील 100 टोल नाक्यांवर हा पास चालणार आहे. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनधारकांना मोठा फायदा होणार आहे.
राजमार्ग यात्रा अॅप किंवा NHAI वेबसाइटवर जाऊन पास खरेदी करता येईल. ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर फक्त 2 तासांत पास सक्रिय होतो.
200 वेळा टोलवर ये-जा करण्यासाठी आधी 11,000 रुपये लागत होते. आता फक्त 3,000 रुपयांतच हा प्रवास शक्य आहे. किमान 8,000 रुपयांची बचत यामुळे होणार आहे.
काही कंपन्यांच्या फास्टॅगवर हा पास सक्रिय होणार नाही. वाहन क्रमांक नोंदणी अद्ययावत करणे आवश्यक आहे.