सरकारनामा ब्यूरो
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या राजकारणात सक्रिय आहेत. खासदार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. यासोबतच नुकतीच पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सुळेंकडे देण्यात आली.
ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुलगे हे युवा सेना प्रमुख आहेत. तसेच वरळीतून आमदार झाल्यावर त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण मंत्रीरदाची धुरा सांभाळली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पक्षाविस्तारासाठी अमित ठाकरेंनी महाराष्ट्रात विविध दौरे केले आहेत.
भाजप नेते व राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र यांचे सुजय विखे हे विद्यमान खासदार आहेत. विखे कुटुंबाचं राजकारणाचा वारसा ते चालवत आहेत.
भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे विद्यमान आमदार आहेत. तसेच ते भाजप जालना जिल्हाप्रमुखसुद्धा आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकेर या विद्यमान आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळात अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र हे विद्यमान खासदार आहे. वडीलांचा राजकीय वारसा ते पुढे चालवत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या विस्तारासाठी काम करताना दिसतात. विशेषत: शहरी भाग आणि मुंबईत पक्षाची धुरा सांभाळतात.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे सक्षमपणे राणे कुटुंबातील राजकारणाचा वारसा चालवत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणा खडसे राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत त्या सक्रिय आहेत.
काँग्रेसमधून निलंबित झालेले माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांची नुकतीच विधान परिषद सदस्यपदी निवड झाली आहे.