Rashmi Mane
सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती झाली.
वाशिमच्या असणाऱ्या मनीषा यांनी वडिलांच्या प्रेरणेमुळे लहानपणी पाहिलेले स्वप्न त्यांनी पूर्ण केले.
मनीषा यांनी पुण्यातील 'आयएएलएस लॉ' कॉलेजमधून 'एलएलबी'ची पदवी घेतली.
'एलएलबी' झाल्यानंतर 'यूपीएससी'ची तयारी करण्यासाठी वडिलांनी त्यांना दिल्लीला पाठविले.
'यूपीएससी'च्या पहिल्याच प्रयत्नात मनीषा 833 व्या रँक मिळवत उत्तीर्ण झाल्या.
पण त्याच काळात त्यांच्या वडिलांची तब्बेत अचानक खराब झाली. दरम्यानच्या काळात त्यांच्या आईलाही कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाने यूपीएससी नाही तर आयुष्याच्या परीक्षेला तोंड देत रँक मिळविला होता.
मनीषा यांनी 2018 ला दुसऱ्यांदा 'यूपीएससी' परीक्षा दिली. या परीक्षेत त्या देशात 33 व्या रँकने उत्तीर्ण झाल्या.
सोलापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सोलापूरच्या प्रकल्प अधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या.