वंचित - ठाकरे गट युतीचा भाजपला फायदा होणार की तोटा ?

सरकारनामा ब्यूरो

वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटामध्ये अखेर युती झाली आहे. दोन्ही पक्ष आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. 

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar | Sarkarnama

ठाकरे गट आणि वंचित युतीमुळं भाजपचं टेन्शन वाढलं.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar | Sarkarnama

वंचितमुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 30 जागांवर फटका बसल्याची कबुली प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar | Sarkarnama

वंचितचा प्रयोग करून आंबेडकर यांनी राज्यात आपली वेगळी ताकद निर्माण केली आहे.

Prakash Ambedkar | Sarkarnama

नव्या राजकीय समीकरणामुळे महाविकास आघाडीला फायदा होईल का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray | Sarkarnama

वंचितने 2019 ला विधानसभेत उमेदवार दिल्यामुळे अनेक ठिकाणी मतं विभागली गेली. त्याचा फायदा भाजपला झाला होता. तर सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला होता.

Congress | Sarkarnama

वंचित- ठाकरे गटाच्या युतीनंतर भाजप आणि शिंदे गट आगामी काळात मनसेला सोबत घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Maharashtra Navnirman Sena | Sarkarnama

वंचितची लोकसभा निवडणूकीत 'एमआयएम'सोबत युती होती.

MIM | Sarkarnama

वंचितमुळे विधानसभा निवडणुकीत आघाडीला 30 हून अधिक जागांचा फायदा होणार असल्याची चर्चा.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar | Sarkarnama