Pradeep Pendhare
एक मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद सरकारी दस्तऐवजांमध्ये त्याचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि अडनाव या क्रमाने करणे बंधनकारक असणार आहे.
पिंक ई-रिक्षा 17 शहरातल्या 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसाह्य देणार, यासाठी 80 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकार उभारणार
शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींच्या अनुदानात 25 हजार रुपयापर्यंत वाढीची घोषणा
राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी 78 कोटी रुपयांची तरतूद करणार
रुग्णांची विशेषतः गरोदर माता आणि बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी 3 हजार 324 रुग्णवाहिका असणार
महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरुपी युनिटी माॅल बांधण्यात येणार आहे. उलवे, नवी मुंबई येथे हा माॅल उभारला जाणार आहे.
महिला बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीतून आतापर्यंत 15 लाख महिला लखपती दीदी झाल्याचा दावा. त्यांची संख्या 25 लाखपर्यंत वाढवली जाण्याचा प्रयत्न करणार
तृतीयपंथी 2024 धोरणानुसार भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व सरकारी योजनांमध्ये स्त्री-पुरुषांसोबतच 'तृतीयपंथी' हा लिंग पर्याय उपलब्ध असून तृतीयपंथीयांना राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार