Rashmi Mane
नवा महिना सुरू होताच आर्थिक नियमांशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्सकडे लक्ष द्या! गॅस सिलिंडर, पेन्शन, आयटीआर आणि मोबाईल कॉलिंगसह अनेक विषय चर्चेत आहेत.
पेन्शन सुरू ठेवण्यासाठी जीवन प्रमाणपत्र जमा करणं आवश्यक आहे. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करा.
ऑडिट लागू असलेल्या पात्र करदात्यांना आयकर रिटर्न भरण्यासाठी 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही मुदत सर्वांना लागू नाही.
CNAP सुविधेमुळे कॉल करणाऱ्याचं नाव मोबाईलवर दिसू शकतं. मात्र, ही सुविधा नेटवर्क आणि अंमलबजावणीवर अवलंबून असेल.
दर महिन्याच्या 1 तारखेला गॅसच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरांकडे ग्राहकांचं लक्ष असेल.
बँका मुदत ठेवींवरील व्याजदर बदलू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित बँकेचे नवीन दर तपासणं फायदेशीर ठरेल.
जीएसटी नोंदणी आणि रिफंड प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सुधारणा प्रस्तावित आहेत. प्रत्येक बदलाची अंमलबजावणी मात्र वेगवेगळ्या तारखांना होऊ शकते.
नाही! काही अपडेट्सची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नियमाची अधिकृत घोषणा तपासणं महत्त्वाचं आहे.