सरकारनामा ब्यूरो
ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील जिवाजीराव शिंदे आणि विजयाराजे शिंदे यांच्या वसुंधरा राजे या कन्या आहेत.
मुंबईच्या प्रेझेंटेशन कॉन्वेंट स्कूलमधून प्राथमिक शिक्षण केले, तर सोफिया महाविद्यालयातून इकॉनॉमिक्स आणि सायन्समध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली.
राजघराण्याच्या असूनही त्यांच्यावर अगदी साध्या पद्धतीने जीवन जगण्याचे संस्कार झाले. कायम समाजसेवेचे धडे शिकवल्यामुळे त्यांच्यात तशीच भावना रुजत गेली.
1984 मध्ये राजकारणात त्यांनी प्रवेश केला. आपल्या कार्याप्रती प्रामाणिक आणि निष्ठावान असल्याने त्यांना वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री बनवण्यात आले.
पुढील वर्षात केंद्रीय मंत्रालयात त्यांच्याकडे अणुऊर्जा विभाग आणि अवकाश तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली.
भैरोसिंह शेखावत हे उपराष्ट्रपती झाल्यानंतर वसुंधरा राजे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या विस्तारात मोठी भूमिका बजावली.
2003 च्या विधानसभा निवडणुकीत झालरापाटन मतदारसंघातून बहुमतांनी विजय मिळवत राजस्थानच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या.
राज्याच्या विकासाबरोबर स्त्री सक्षमीकरणासाठीही त्यांनी राजस्थानमध्ये अनेक विकासाच्या योजना अमलात आणल्या.
वाचन, संगीत, घोडस्वारी आणि फोटोग्राफी हे त्यांचे आवडते छंद आहेत. व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून त्या आपल्या आवडी जपतात.
R