First Pilot of India : भारतीय विमानवाहतुकीचा पाया घालणारा ‘तो’ धाडसी पायलट कोण होता?

Rashmi Mane

गौरवशाली इतिहास

विमान वाहतुकीच्या जगात भारताचा गौरवशाली इतिहास आहे. अनेक धाडसी लोकांनी विमाने उडवून देशाला अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे.

First Male Pilot of India J R D Tata | Sarkarnama

भारताचे पहिले पायलट

भारताच्या हवाई इतिहासाची सुरुवात ज्या व्यक्तीने केली, त्याचे नाव आजही आदराने घेतले जाते. चला जाणून घेऊया भारताचे पहिले पायलट कोण होते.

First Male Pilot of India J R D Tata | Sarkarnama

जे. आर. डी. टाटा

भारताचे पहिले परवाना प्राप्त पायलट होते जहाँगीर रतनजी दादाभाई टाटा, जे "जे. आर. डी. टाटा" नावाने अधिक प्रसिद्ध आहेत.

First Male Pilot of India J R D Tata | Sarkarnama

पहिला पायलट परवाना

देशाच्या स्वातंत्र्याच्या खूप आधी, १० फेब्रुवारी १९२९ रोजी त्यांना पहिला पायलट परवाना मिळाला.

First Male Pilot of India J R D Tata | Sarkarnama

पहिले व्यावसायिक विमान

1932 मध्ये, जेव्हा भारतात विमान वाहतुकीचं स्वप्न देखील दुर्मीळ होतं, तेव्हा जे.आर.डी. टाटा यांनी देशाच्या आकाशात पहिले व्यावसायिक विमान उडवले.

First Male Pilot of India J R D Tata | Sarkarnama

बालपण

जेआरडी टाटा यांची आई फ्रेंच होती, त्यामुळे त्यांच्या बालपणाचा बराचसा काळ फ्रान्समध्ये गेला.

First Male Pilot of India J R D Tata | Sarkarnama

विमान क्षेत्राबद्दल

फ्रान्समध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत, जेआरडी टाटा विमानचालन प्रणेते लुई ब्लेरियट यांना भेटले, ज्यामुळे त्यांच्यात विमान क्षेत्राबद्दल आयुष्यभराची आवड निर्माण झाली.

First Male Pilot of India J R D Tata | Sarkarnama

विमान वाहतुकीचे जनक

जेआरडी टाटा यांना विमान प्रवासाची खूप आवड होती. त्यांना भारताच्या नागरी विमान वाहतुकीचे जनक मानले जाते.

First Male Pilot of India J R D Tata | Sarkarnama

Next : हातात बंदूक, अंगावर बर्फ! सियाचीन सीमेवर थंडीत काय खातात जवान?

येथे क्लिक करा