सरकारनामा ब्यूरो
ज्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. त्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत.
'कसबा पेठ' हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता.
भाजपने पूर्ण ताकद लावूनही कसब्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला.
पहिलं कारण:
पेठेतल्या मतदारांनी भाजपच्या हेमंत रासनेंना नाकरलं.
दुसरं कारण:
कसब्यात यावेळी थेट दुरंगी लढत झाली. यापूर्वी कसब्यामध्ये तिरंगी लढती झाल्या होत्या. तिरंगी लढतींमुळे भाजपला विजय सोपा होत होता.
तिसरं कारण:
कसब्यातील मतदान अपेक्षेप्रमाणे झालंच नाही. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये गेल्या वेळेपेक्षा मतदानात पाच टक्के घट झाली.
चौथे कारण:
रवींद्र धंगेकर हे "सर्वसामान्यांचे कार्यकर्ते, आपला माणूस आणि कामाचा माणूस" म्हणून धंगेकरांची ओळख.
पाचवं कारणं:
2022मध्ये महाविकास आघाडी सरकार पडल्यामुळे ठाकरे गटाला मिळालेली सहानुभूती हेही पराभवाचे महत्वाचे कारण असू शकते.