Amit Ujagare
मुंबईतल्या सावली डान्सबारची मालकी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कुटुंबियांकडं असल्यानं सध्या ते चर्चेत आहेत.
या व्यवसायाव्यतिरिक्त त्यांचे इतरही अनेक उद्योग आहेत. त्यातून त्यांना नेमकं किती उत्पन्न मिळतं तसंच त्यांची एकूण संपत्ती किती? जाणून घेऊयात.
माय नेते डॉक कॉम या वेबसाईटच्या माहितीनुसार, योगेश कदम यांच्याकडं आणि पत्नीकडं मिळून ८ लाख ९९ हजारांची कॅश आहे. तसंच २ कोटी १० लाख ४६ हजार ८६२ रुपये बँकेत डिपॉझिट आहेत.
तसंच शेअर्स आणि बॉण्डसमध्ये त्यांनी १ कोटी ५९ लाख ६९ हजार ७७४ रुपये गुंतवले आहेत. ५० लाख ४ हजार ८४६ रुपयांच्या एलआयसी पॉलिसीज त्यांच्याकडं आहेत.
योगेश कदम यांच्याकडं १५ लाख २२ हजार २५४ रुपये किंमती ह्युंदाई क्रेटा कार तसंच १८ लाख २८ हजार २४२ रुपये किंमतीची टोयोटा इनोव्हा कार आहे.
१ कोटी ५९ लाख ९४ हजार ३८३ रुपयांचे सोन्याचे दागिनेही त्यांच्या मालकीचे आहेत. असे एकूण १४ कोटी ०१ लाख ०५ हजार ८१६ रुपयांचा चल संपत्ती त्यांच्याकडं आहे.
तर शेतजमीन (२८,१६,५०० रुपये), बिगरशेती जमीन (९ कोटी ७६ लाख ९३ हजार ९०० रुपये) आहे. तर २ कोटी ७३ लाख ८३ हजार ७५० रुपयांच्या कमर्शिअल इमारती आहेत.
कांदिवलीत ५२ लाख ६५ हजारांचा एक आणि ३६ लाख ९१ हजार ६१० रुपये किंमतीचा असे दोन फ्लॅट आहेत. तर गोरेगावमध्ये २२७३ स्क्वेअर फुटांचा १२ कोटी रुपयांचा आलिशान फ्लॅट आहे. अशी एकूण २५ कोटी ६८ लाख ५० हजार ७६० रुपयांची अचल संपत्ती आहे.
८ कोटी ३२ लाख ३७ हजार २७८ रुपयांचं त्यांच्यावर कर्ज आहे. तर कुटुंबियांच्या नावावर ७ कोटी ३७ लाख ९६ हजार ३५१ रुपयांचं कर्ज आहे.
अशा प्रकारे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडं एकूण ३९ कोटी ६९ लाख ५६ हजार ५८१ रुपयांची संपत्ती आहे. तर एकूण १५ कोटी ७० लाख ३३ हजार ६२९ रुपयांचं कर्ज आहे.