Amit Ujagare
राज्यातील २९ महानगर पालिकांपैकी सुमारे २२ महापालिकांमध्ये भाजपानं एकहती विजय मिळावला आहे.
यांपैकी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नादेड, नागपूर या महापालिकांमध्ये भाजपची दमदार कामगिरी राहिली आहे.
या सर्व निवडणुका भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढल्या.
त्यामुळं मुंबई इथल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अमृता फडणवीस यांनी भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांचं औक्षण केलं.
यावेळी अमित साटम, प्रसाद लाड, आशिष शेलार आदी उपस्थित होते. यांचंही अमृता फडणवीस यांनी औक्षण केलं.
यावेळी फडणवीसांच्या कन्या दिविजा हीन देखील वडील देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेत औक्षण करत आनंद साजरा केला.
यानंतर मुख्यमंत्री थेट नागपूरला गेले त्या ठिकाणी नितीन गडकरी यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांकडूनही पुन्हा त्यांचं औक्षण करुन स्वागत करण्यात आलं.
यावेळी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते.