अनुराधा धावडे
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे.
चाईबासा कोषागारातून 37 कोटी 68 लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले. १७ वर्षांनंतर त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.
बिहारचे आणखी एक मुख्यमंत्री तुरुंगात गेले आहेत. ते म्हणजे जगन्नाथ मिश्रा.
मिश्रा यांनाही चाईबासा कोषागारातील 37.7 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरल्यानंतर त्यांनाही तुरुंगवारी करावी लागली होती.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा हेही तुरुंगात गेले आहेत. 18 सप्टेंबर 2006 रोजी अवघ्या 35 वर्षात मुख्यमंत्री झालेले मधु कोडा जवळपास 23 महिने या पदावर राहिले.
30 नोव्हेंबर 2009 रोजी कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती. तीन वर्षे तुरुंगात जावे लागले.
1999-2000 मध्ये हरियाणामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या कार्यकाळात शिक्षक भरती घोटाळा झाला होता.
जानेवारी 2013 मध्ये दिल्ली न्यायालयाने तीन हजार शिक्षकांच्या बेकायदेशीर नियुक्ती प्रकरणी माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचा मुलगा यांच्यासह 53 जणांना दोषी ठरवले होते. चौटाला आणि त्यांच्या मुलाला 10 वर्षांची शिक्षा झाली. चौटाला तिहार तुरुंगात आहेत.
बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर जयललिता यांनाही तुरुंगवारी करावी लागली.
न्यायालयाने जयललिता यांना चार वर्षांचा तुरुंगवास आणि 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता