Pradeep Pendhare
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं दिल्ली इथं निधन झालं.
सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील हिसवाडा गावात एका जाट कुटुंबात झाला.
मेरठ विद्यापीठातून विज्ञान पदवी आणि एलएलबी पदवी प्राप्त केली.
1968-69 मध्ये, त्यांची मेरठ विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली अन् पुढं त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली.
राजकारणी म्हणून त्यांचा पहिला मोठा कार्यकाळ 1974-77 दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेचा सदस्य होते.
1980 ते 1986 आणि 1986-89 या काळात त्यांनी राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले.Satya Pal Malik
1989 ते 1991 या काळात ते जनता दलाचे सदस्य म्हणून अलीगढमधून 9 व्या लोकसभेचे सदस्य होते.
बिहार, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर, गोवा, अन् मेघालयाचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले.Satya Pal Malik
ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू आणि काश्मीर राज्याचे ते शेवटचे राज्यपाल होते. त्यांच्याच कार्यकाळात 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द झाले.
जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्दचा 5 ऑगस्ट 2019 रोजी निर्णय झाला, त्याचा सहावा वर्धापन दिनीच सत्यपाल मलिक यांनी अखेरचा श्वास घेतला.