सरकारनामा ब्यूरो
जूनमध्ये होणाऱ्या ब्रुसेल्समधील युरोपियन संसदेत भाषण करण्यासाठी माजी आयएएस अधिकारी बी लक्ष्मी कंथम यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
लक्ष्मी कंथम, यांनी याआधी टीटीडीचे जेईओ आणि कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले होते. तसेच बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे संचालकपदही भूषवले आहे.
बी लक्ष्मी कंथम यांना आतापर्यत 100 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही त्यांची नोंद करण्यात झाली आहे.
ते सध्या 2011ला स्थापन करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवसाय संघटनेचे भारत, ब्रिटन आणि युरोपियन या देशातील व्यापार संबंध मजबूत करण्याचे महत्वाचे काम करत आहेत.
येत्या ब्रुसेल्स बैठकीत अक्षय ऊर्जा, शैक्षणिक सहकार्य आणि व्यापार संबंधांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या कार्यक्रमात 44 संसद सदस्य आणि जगभरातील 2740 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
व्यापार, गुणवत्ता, सुरक्षा, हवामान बदल आणि शाश्वत विकास यासारख्या क्षेत्रावर येथे चर्चा होणार आहे. यावेळी प्रामुख्याने भारत-यूरोपीय संघातील(ईयू) व्यापारांशी संबंधित मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
कार्यक्रमात भारताच्या सेमीकंडक्टर उद्योगाला पाठिंबा देण्याचे, व्यापार आणि गुंतवणूक वाढवून महत्त्वाच्या क्षेत्रात भारत आणि युरोपियन देशातील तंत्रज्ञानांच्या माहितीची देवाणघेवाण करण्याचे मार्ग विचारात घेतले जातील.
गेल्या ब्रुसेल्स सत्रात त्यांनी जागतिक व्यापाराची भागीदारी मजबूत करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.