Sunil Kendrekar : अंगात बनियन, खांद्यावर पिशवी! शेतीत राबणारा 'हा' बीडचा माजी कलेक्टर तुफान व्हायरल

Roshan More

सुनील केंद्रेकर

मराठवाडा विभागाची माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे निवृत्तीनंतर आपल्या परभणीतील झरी गावातील शेतीत कष्ट करत आहेत.

Sunil Kendrekar | sarkarnama

बीडचे कलेक्टर

बीड जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून देखील केंद्रेकर यांनी काम पाहिले आहे. स्वच्छ चारित्र्याचा आणि कडक शिस्तीचा अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

Sunil Kendrekar | sarkarnama

दोन वर्ष आधीच निवृत्ती

सुनील केंद्रेकर हे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त असताना 2023 मध्ये निवृत्तीला दोन वर्ष बाकी असताना स्वेच्छा निवृत्ती घेतली.

Sunil Kendrekar | sarkarnama

शेती करण्याचा निर्धार

निवृत्ती घेत असताना आपण शेती करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्या प्रमाणे आपल्या परभणीतील गावी ते शेती करत आहेत.

Sunil Kendrekar | sarkarnama

बाजारात खरेदी

अधिकारीपदावर असताना देखील केंद्रेकर आपल्या पत्नीसोबत अनेकदा आठवडी बाजारात खरेदी करताना दिसून येत.

Sunil Kendrekar | sarkarnama

'तो' फोटो व्हायरल

शेतीच्या कामात रममान असणारे सुनील केंद्रकरांचा अंगात बनियन, खांद्यावर पिशवी आणि हातात बादली घेतलेला त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Sunil Kendrekar | sarkarnama

नोटिझन्सकडून कौतुक

माजी IAS अधिकारी असणारे आणि प्रशासनातील मोठ मोठ्या पदावर काम करणाऱ्या केंद्रेकरांचा फोटो पाहून सोशल मीडियावर त्याच्या साधेपणाविषयी कौतुक होते आहे.

Sunil Kendrekar | Sarkarnama

निवृत्तीनंतर चालत घरी

केंद्रकर हे प्रमाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर शासकीय वाहन कार्यालयात सोडून ते चालत आपल्या घरी गेले होते.

Sunil Kendrekar | sarkarnama

NEXT : चीनचा व्हिसा मिळणं झालं सोपं; कशी आहे प्रक्रिया? समजून घ्या...

China-Visa-rules-eased-for-Indians | sarkarnama
येथे क्लिक करा