Ganesh Thombare
ओडिशातील रेल्वे अपघातानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे चर्चेत आलेत. त्यांचा रेल्वेमंत्री बनण्याचा प्रवास जाणून घेऊयात.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरचे अश्विनी वैष्णव हे माजी विद्यार्थी आहेत.
अश्विनी वैष्णव हे 1994 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.
अश्विनी वैष्णव हे ओडिशा केडरमधील माजी आयएएस अधिकारी आहेत.
अश्विनी वैष्णव यांनी बालासोर आणि कटकचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे खासगी सचिव म्हणून वैष्णव यांनी काम पाहिलेले आहे.
उच्च शिक्षणासाठी अश्विनी वैष्णव यांनी 2008 मध्ये सरकारी नोकरी सोडली.
28 जून 2019 ला अश्विनी वैष्णव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
जुलै 2021 पासून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे आहे.
बालासोर रेल्वे अपघातानंतर दोन दिवस रेल्वे अपघाताच्या ठिकाणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे बसून होते.