Aslam Shanedivan
देशात NEET आणि CBSE परीक्षांमधील पेपरफुटी व अनियमिततेमुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. याविरोधात कॉकरोच जनता पार्टीने आवाज उठवला
तसेच कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतून येत दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केले.
तसेच अभिजीत दिपके यांच्यासह विरोधकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
यानंतर देशभर कॉकरोच जनता पार्टीची चर्चा होत असतानाच नव्या पक्षाची घोषणा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी केली आहे.
इश्क करो पार्टी असे या पार्टीचे नाव असून सदस्यत्वासाठी मोहीम सुरू करण्यात आली असून पार्टीत सहभागी होण्यासाठी वयाचीही अट घालण्यात आली आहे.
काटजू यांनी, सीजेपीच्या फॉलोअर्सनी वेळ वाया न घालवता नवी इश्क करो पार्टी जॉइन करा असे आवाहन करत सदस्यत्व घेण्यासाठी मेल आयडी जारी केला आहे.
तर अभिजीत दीपके हे मूर्ख असून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याने काही फरक पडणार नसून त्यांच्या जागी दुसरा कुणी मंत्री होईल असे म्हटलं आहे.
तसेच वयाची अट ४४ वर्षे घातली असून अध्यक्ष इरफान अली यांच्याशी संपर्क करण्यासह प्रवेशानंतर उपाध्यक्ष म्हणून निवड करू असे म्हटले आहे.
तर इश्क करो पार्टीच्या माध्यमातून देशात बेरोजगारी, भूक, गरीबी आणि आरोग्याचे प्रश्न उपस्थित केले जातील असेही काटजू म्हणाले.