सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्रात यात्रा दाखल झाल्यानंतर आज चौथ्या दिवशी देखील यात्रेतील गर्दी आणि उत्साह तूसभरही कमी झालेली नाही, उलट ती वाढतच आहे
काॅंग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या भारत जोडो यात्रेबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड आकर्षण दिसून येत आहे.
आपल्या काळात इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना पाहिलेल्या या महिलांना इंदिराजींचा नातू आणि राजीव यांचा मुलगा पाहण्याची उत्सुकता जागोजागी दिसून येत होती.`इंदिरा गांधीचा नातू पाहिला गं बाई`, अशा उत्सफूर्त प्रतिक्रिया उमटतांना दिसल्या.
भारत जोडो यात्रा चौथ्या दिवशी गुरुवारी (ता.१०) सकाळी कापशी गुंफा येथून निघाली. यावेळी लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. राहुल गांधी यांनी विविध घटकातील लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.
युवक-युवतींचा मोठ्या प्रमाणात भारत जोडो याञेत सहभाग.
घराच्या छतावर व रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिला, शेतकरी, कष्टकरी, आबाल वृद्धांनी इंदिरा गांधी यांचा नातू पाहायचा म्हणून मोठी गर्दी केली होती.
राहुल गांधी यांची पदयाञा आज नांदेड शहरात दाखल झाली. महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये होणार आहे.