Morarji Desai Birthday: स्वातंत्र्यलढ्यात उतरण्यासाठी सरकारी सेवेचा राजीनामा देणारे चौथे पंतप्रधान...

सरकारनामा ब्यूरो

प्रामाणिकपणाचे धडे

मोरारजी देसाई यांचा जन्म गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील भदेली या गावात झाला. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या वडिलांकडून कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाचे धडे घेतले होते.

Morarji Desai | Sarkarnama

मुंबईतील विल्सन सिव्हिल सर्व्हिस

सेंट बुसार हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील विल्सन सिव्हिल सर्व्हिसमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी बारा वर्षे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले.

Morarji Desai | Sarkarnama

सरकारी सेवेचा राजीनामा

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात त्यांनी सरकारी सेवेचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत स्वातंत्र्य लढ्याच्या संघर्षात प्रवेश केला.

Morarji Desai | Sarkarnama

लढ्यादरम्यान तीनदा तुरुंगवास

स्वातंत्र्य लढ्यादरम्यान त्यांना तीनदा तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर ते काँग्रेस कमिटीचे सदस्य झाले आणि गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव होते.

Morarji Desai | Sarkarnama

भूषवली अनेक मंत्रिपदे

पदभार स्वीकारल्यानंतर बी.जी. खेर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मंत्रालयात महसूल, कृषी, वन आणि सहकार मंत्रिपद भूषवले.

Morarji Desai | Sarkarnama

कारकिर्द

देसाई यांनी त्यांच्या कार्यकाळात जमीन महसुलात अनेक सुधारणा केल्या. पोलिस प्रशासनातही त्यांनी जनता आणि पोलिसांमधील अडथळे दूर केले.

Morarji Desai | Sarkarnama

मुंबईचे मुख्यमंत्री

1952 मध्ये मुंबईचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकरी आणि भाडेकरूंच्या अडचणी दूर केल्या तसेच त्यांच्यासाठी कायदे संपुष्टात आणले.

Morarji Desai | Sarkarnama

केंद्रीय मंत्रिमंडळात सामील

राज्यांच्या पुनर्रचनेनंतर ते वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले. नंतर 1958 मध्ये वित्त खात्याचाही कार्यभार त्यांनी स्वीकारला.

Morarji Desai | Sarkarnama

पंतप्रधान पदाची शपथ

इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान आणि अर्थ खात्याचे प्रभारी मंत्री तर 1977 मध्ये त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

Morarji Desai | Sarkarnama

Next : कोण आहेत जगातील 8 'फिट' राजकीय नेते? पाहा फोटो