Rashmi Mane
महाराष्ट्राचे लोकनेते, मराठवाड्याचे सुपुत्र विलासराव दगडोजीराव देशमुख यांनी बाभळगावचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.
हजरजबाबीपणा, आक्रमक वृत्ती, राजकीय परिपक्वता, राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य.
हसतमुख चेहरा, उमदे व्यक्तिमत्व, संयमी स्वभाव, आवाजातील चढ- उतार, बोलण्यातील अदब भल्याभल्यांना हुरळ घालायचे त्यामुळेत ते नेहमी माणसांच्या गराड्यात राहायचे.
युवक काँग्रेसचे नेते, तत्कालिन एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समिती उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य ते 1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात त्यांच्याकडे मंत्रिपद होतं. 1995 ला शिवाजीराव लव्हेकर यांच्याकडून पराभव झाल्यानंतर 1999 ला पुन्हा विलासराव 95 हजार मतांच्या फरकाने निवडून आले.
1999 ते 2003 मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म त्यांनी भुषवली 2004 आणि 2008 ला ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
मनमोहन सिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते.
विलासरावांनी शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार पाहिला.
राजकारणापलीकडे मैत्री जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव देशमुख.
भाषणातून विलासराव नेहमी सगळ्यांची मने जिंकून घेत असत.