Amit Ujagare
सोनिया गांधी यांचा जन्म ९ डिसेंबर १९४६ रोजी इटलीतील विसेंझा येथील लुसियाना इथं झाला, त्यांचं संगोपन एका पारंपारिक रोमन कॅथलिक कुटुंबात झालं.
स्थानिक शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला तिथं त्यांची भेट राजीव गांधींशी झाली, त्यानंतर १९६८ मध्ये दोघांनी लग्न केलं.
राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसची अवस्था बिकट बनल्यानं नाईलाजानं त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९८ मध्ये पक्षाचे नेते म्हणून पदभार अन् बावीस वर्षे अध्यक्षपदी कायम.
काँग्रेस पक्षाच्या १२५ वर्षांच्या इतिहासात त्या सर्वात जास्त काळ अध्यक्ष राहिलेल्या एकमेव व्यक्ती आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली, २००४ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने इतर पक्षांच्या मदतीनं तसंच डाव्या राजकीय पक्षांसोबत युती करून पहिल्यांदा युपीएचं सरकार स्थापन केलं.
२००९ मध्ये पुन्हा सत्तेत आलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावल्याचं श्रेय सोनिया गांधींना दिलं जातं.
२००७ मध्ये, अमेरिकेतील 'सेम मासिका'नं त्यांना जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात शक्तिशाली महिला म्हणून घोषित केलं.
२०१० मध्ये, फोर्ब्स मासिकानं त्यांना जगातील नवव्या क्रमांकाच्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून घोषित केलं. २०१२ मध्ये पुन्हा फोर्ब्समध्ये त्या १२ व्या स्थानी राहिल्या.
२००७ आणि २००८ मध्ये सोनिया गांधी यांना टाइम मॅगेझिनच्या जगातील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये देखील स्थान देण्यात आलं होतं.