सरकारनामा ब्यूरो
मुंबईत आयोजित 'जी २०' व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची (TIWG-Trade & Investment Working Group) बैठक केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत पार पडली.
या तीन दिवसीय बैठकीसाठी जी २० देश- विदेशातील आंतरराष्ट्रीय संघटनांचे १०० पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते.
मुंबईतील पहिल्या 'TIWG' मीटिंगच्या दिवशी त्यांनी साइड इव्हेंट, ट्रेड फायनान्स गॅप बंद करण्यासाठी विविध वित्तीय संस्थांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केले.
'डिजिटलायझेशन आणि फिनटेक सोल्यूशन्स ट्रेड फायनान्स'मध्ये प्रवेश कसा करू शकतात यावर देखील चर्चा या बैठकीत झाली.
'TIWG' मीटमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले.
पियुष गोयल यांनी जी -20 परिषदेतील प्रदर्शनालाही भेट दिली.
जी-20 बैठकीसाठी आलेल्या पाहुण्यासाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीसाठी आलेले परदेशी पाहुणे संस्कृतीक कार्याक्रम पाहून भारावून गेले होते.