Rashmi Mane
दिल्ली येथे होणारी G20 शिखर परिषद भारत मंडपममध्ये होणार आहे.
सध्याच्या घडीला 'भारत मंडपम' ही इमारत जगातील सर्वात शक्तिशाली इमारत झाली आहे.
भारत मंडपम हे एक नवीन 'कन्व्हेन्शन कॉम्प्लेक्स' आहे; जे भारताला जागतिक व्यापारात चालना देण्यासाठी मदत करेल.
भारत मंडपम हे नाव भगवान बसवेश्वरांच्या अनुभव मंडपमच्या कल्पनेतून आले आहे.
भारत मंडपम कॉम्प्लेक्स हा भारतातील सर्वात मोठा सभामंडप आहे.
भारत मंडपममध्ये अष्टधातूंपासून बनवलेल्या नटराजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्याची उंची 27 फूट आणि वजन 18 टन आहे. अष्टधातूंपासून बनवलेली ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे.
तामिळनाडूतील स्वामी मलाई येथील प्रसिद्ध शिल्पकार राधाकृष्णन आणि त्यांच्या टीमने सात महिन्यांत ही मूर्ती तयार केली आहे. चोल साम्राज्यापासून राधाकृष्णन यांच्या ३४ पिढ्या शिल्प बनवण्याचे काम करत आहेत.
वैश्विक ऊर्जा, सर्जनशीलता आणि शक्तीचे महत्त्वाचे प्रतीक असलेली नटराजाची ही मूर्ती जी20 शिखर परिषदेत आकर्षण ठरणार आहे.