सरकारनामा ब्युरो
G20 म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी. हा जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे. 1999 साली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली होती.
पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात 1997 साली आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर G20 गट उदयास आला.
जी20 राष्ट्रगटात भारताशिवाय अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका अशा 19 देशांचा समावेश आहे.
जगातली 60 टक्के लोकसंख्या जी20 राष्ट्रांमध्ये राहते. जागाच्या एकूण जीडीपीच्या 85 टक्के जीडीपी या देशांतून येतो. जागतिक व्यापारातील 75 टक्क्यांहून अधिक व्यापार G20 देशांत एकवटला आहे.
दरवर्षी एका देशाकडे G20चं अध्यक्षपद येतं. यालाच G20 प्रेसिडंसी म्हणतात.
भारत इंडोनेशिया आणि ब्राझीलच्या मदतीनं G20चा कारभार पाहणार आहे. 2023 सालची G20 शिखर परिषद भारतात होणार आहे.
G20चं अध्यक्षपद भारताला मिळत असल्याच्या निमित्तानं वर्षभरासाठीच्या नव्या G20 वेबसाईटचं आणि लोगोचं अनावरण 8 नोव्हेंबरला करण्यात आलं.