Akshay Sabale
स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत नेहरू निवडून आले होते. त्यानंतर पुढील 16 वर्षे नेहरू देशाचे पंतप्रधान होते.
इंदिरा गांधी यांनी 1967 मधून रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत राजकारणाला सुरूवात केली. त्या 1966-77 आणि 1980-84 पर्यंत देशाच्या पंतप्रधान होत्या.
इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी यांनी पहिल्यांदा प्रतापगड-रायबरेली मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. नंतर ते 1957 मधून रायबरेलीतून निवडून आले.
इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांना पहिल्यांदा अमेठी पराभवाला सामोरे जावं लागलं. नंतर 1980 च्या लोकसभा निवडणुकीत ते अमेठीतून निवडून येत खासदार बनले.
संजय गांधींच्या पत्नी मनेका गांधींचा 1984 मध्ये अमेठीत पराभव झाला होता. नंतर पिलीभीत मतदारसंघातून त्या निवडून येत होत्या. 2024 मध्ये सुलतानपूरमधून मनेका गांधींचा पराभव झाला.
1981 मध्ये अमेठीत झालेल्या पोटनिवडणुकीत राजीव गांधी निवडून आले होते. नंतर 1984 मध्ये ते पंतप्रधान बनले. पण, 1991 मध्ये राजीव गांधींची हत्या करण्यात आली.
1999 मध्ये सोनिया गांधी अमेठीतून निवडून आल्या. नंतर 2004 पासून सलग 2024 पर्यंत त्या रायबरेलीतून निवडून येत होत्या. सध्या त्या राज्यसभा सदस्या आहेत.
2004 मध्ये राहुल गांधी अमेठीतून लोकसभेवर निवडून आले. पण, 2019 मध्ये स्मृती इराणींनी त्यांचा पराभव केला. नंतर ते 2019 वायनाड, 2024 मध्ये रायबरेली आणि वायनाडमधून निवडून आले.
वरूण गांधी 29 व्या वर्षी पिलीभीत मतदारसंघातून निवडून आले. यानंतर सुलनातपूरमधून निवडून गेले. पण, 2024 च्या निवडणुकीत भाजपनं त्यांचं तिकीट कापलं.
प्रियंका गांधी पहिल्यांदाच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत.