Rajanand More
गँगस्टर आणि बिहारमधील सिवान लोकसभा मतदारसंघाचे आरजेडीचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचा मुलगा. पहिल्यांदाच राजकारणात.
शहाबुद्दीन यांच्या पत्नी हिना आणि मुलगा ओसामा यांनी लालूप्रसाद यादव यांच्या उपस्थितीत आरजेडीमध्ये प्रवेश केला आहे. ओसामा हे पहिल्यांदाच अधिकृतपणे पक्षाशी जोडले गेले.
तीन वर्षांपूर्वीच कोरोनामुळे तुरुंगात असताना मृत्यू झाला आहे. खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. बिहारमधील बाहुबली म्हणून ओळख होती.
शहाबुद्दीन यांच्या मृत्यूनंतर लोकसभा निवडणूकीत आरजेडीने हिना यांना तिकीट न दिल्यान त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला.
ओसामा हे शहाबुद्दीन यांचे राजकीय वारसदार म्हणून पहिल्यांदाच समोर आले आहेत. त्यांनी अधिकृतपणे आरजेडीचे सदस्य घेत आपली पुढील दिशा निश्चित केली आहे.
सिवानमध्ये 1995 मध्ये जन्मलेल्या ओसामा उच्चशिक्षित आहे. त्यांनी लंडमध्ये जाऊन एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. दहावीनंतर बारावीपर्यंतचे शिक्षण दिल्लीत झाले.
लंडनहून परतल्यानंतर 2021 मध्ये आयशा यांच्याशी विवाह केला. त्या पेशाने डॉक्टकर असून अलीगड विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली आहे.
ओसामा हे राजकारणापासून दूर राहिले होते. पण वडिलांच्या निधनानंतर आईला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले. त्यानंतर ओसामा यांनी सक्रीय सहभाग वाढला.
गॅंगस्टर शहाबुद्दीन यांच्या मुलाच्या पक्षात प्रवेश दिल्याने भाजप नेत्यांनी टीका केली आहे. गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचार हेच आरजेडीचे प्रतीक असल्याचे बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी म्हटले आहे.