GenZचा दिल्लीत एल्गार! कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात तरुणांनी काय मांडले मुद्दे; पाहा फोटो

Amit Ujagare

१) पेपर लीक

NEETच्या पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर सध्या कॉकरोच जनता पार्टी या ऑनलाईन चळवळीचं जोरदार आंदोलन सुरु आहे.

Cockroach Janata Party Delhi Agitation

२) अभिजीत दिपके

आंदोलनासाठी या चळवळीचा प्रणेता अभिजीत दिपके हा अमेरिकेतील बोस्टन इथून दिल्लीत दाखल झाला असून सध्या आंदोलनस्थळी तो उपस्थित आहे.

Cockroach Janata Party Delhi Agitation

३) GenZ तरुणांचा एल्गार

या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर जेनझी तरुण-तरुणींसह काही सामाजिक कार्यकर्ते आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले वयस्क मंडळी देखील आहेत.

Cockroach Janata Party Delhi Agitation

४) विविध मुद्यांवर आंदोलन

देशात भडकलेली महागाई, सातत्यानं होत असलेले परीक्षांचे पेपर लीक, राजकारणातील वाढता बेजबाबदारपणा, बेरोजगारी यासांरख्या विविध मुद्द्यांवर इथं तरुणांनी आंदोलन केलं.

Cockroach Janata Party Delhi Agitation | Cockroach Janata Party Delhi Agitation

५) पोस्टरवरील मुद्दे काय?

या आंदोलनात हातात पोस्टर घेऊन तरुण मंडळी सहभागी झाले होते. या पोस्टर्सवर 'वादे बहुत सुने, अब काम करो', 'विद्यार्थ्यांचं भविष्य खेळ नाही', 'बेटा तुमसे ना हो पाएगा', 'कितनी बार आएगी पेपर लीक वाली सरकार', 'धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो', 'नीट पेपर लीक पर कडक कारवाई करो' अशा घोषणांचा समावेश होता.

Cockroach Janata Party Delhi Agitation

६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

त्याचबरोबर अभिजीत दिपकेच्या हातामध्ये तसंच इतर तरुणांच्या हातामध्ये संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि संविधानाची प्रतही दिसत आहे.

Cockroach Janata Party Delhi Agitation

७) देशभरातील तरुण सहभागी

या आंदोलनात देशाच्या सर्वच भागातून जेनझी तरुण सहभागी झाले होते. यामध्ये दिल्लीसह आजुबाजुचा युपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल, पंजाबचे तरुण तसंच महाराष्ट्रातून मुंबई, कोल्हापूर इथूनही तरुण यात सहभागी झाले आहेत.

Cockroach Janata Party Delhi Agitation

८) चळवळीचं जनआंदोलनात रुपांतर

आजवर ही चळवळ केवळ सोशल मीडियात, ऑनलाईन स्वरुपातच राहील असं अनेकांना वाटत असताना पहिल्यांदाच या चळवळीनं रस्त्यावरुन उतरुन दमदारपणे आंदोलन केल, जो लोकशाहीतला विरोधाचा सर्वात महत्वाचा भाग आहे.

Cockroach Janata Party Delhi Agitation