Rashmi Mane
जगभरातील नेते G20 शिखर परिषदेसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. या समीटमध्ये सहभागी होण्यासाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनीही आल्या आहेत.
जॉर्जिया मेलोनी यांनी दिल्लीत ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जॉर्जिया मेलोनी ऋषी सुनक यांच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी मेलोनी यांनी ऋषी सुनक यांच्याशी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली आहे.
जॉर्जिया मेलोनीचा जन्म 15 जानेवारी 1977 रोजी झाला. त्या एक इटालियन पत्रकार आणि राजकारणी आहेत.
जॉर्जिया मेलोनी या 'ब्रदर्स ऑफ इटली पार्टी'च्या नेत्या आहेत. वयाच्या १५ व्या वर्षी मेलोनी यांनी युवा शाखेत काम करण्यास सुरु केले.
वर्षभरापूर्वी जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पंतप्रधान झाल्या आहेत. तेव्हा त्या अवघ्या ४५ वर्षांच्या होत्या.
2006 मध्ये त्या राष्ट्रीय आघाडीकडून खासदार म्हणून निवडून आल्या.
जॉर्जिया मेलोनी G20 परिषदेत इटलीचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत.