सरकारनामा ब्यूरो
संतशिरोमणी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे सहभागी होत, फुगडीचा ठेका धरला.
वारीत सहभागी होत सुप्रिया सुळेंनी वारकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी तुळस डोईवर घेऊन सुप्रिया सुळे यांनी वारीची परंपरा जपली.
सुप्रिया सुळे यांनी ग्यानबा-तुकारामाचा जयघोष करत दिंडीत सहभाग नोंदवला.
यावेळी सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग होती.
विठ्ठलाच्या मोठ्या प्रतिमेकडे पाहत सुप्रिया सुळे भक्तीत दंग झाले.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी संतशिरोमणी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणांवर माथा टेकवून भक्तिभावाने दर्शन घेतले.
पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळे यांच्यासोबत पुण्यातील कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकरही सामील झाले होते.