Deepak Kulkarni
गोकुळच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव पराभूत झाल्यानंतर आता शौमिका महाडिक यांचाही पराभव झाला आहे.
शौमिका महाडिकांना 7 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती.
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या प्रमुख नेत्या आणि माजी संचालिका शौमिका महाडिक यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'चे उमेदवार माजी आमदार राजू जयवंतराव आवळे यांनी शौमिका महाडिक यांचा पराभव करत जायंट किलर ठरले.
त्यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे त्यांचे दीर असून माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांचे सासरे आहेत.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचं माजी अध्यक्षपद शौमिका महाडिकांनी भूषवलं आहे. त्या जिल्हा परिषद सदस्यही राहिल्या आहेत.
भाजपकडून महिला मोर्चाचं उपाध्यक्षपद शौमिका महाडिक यांच्याकडे देण्यात आलं आहे.
गोकुळ दूधसंघाच्या गेल्या निवडणुकीत शौमिका महाडिकांनी 43 मतांनी विजय खेचून आणला होता. त्यावेळी त्यांनी अंजना केदारी रेडेकर यांचा पराभव केला होता.
शौमिका महाडिक या 2022 मध्ये पहिल्यांदाच गोकुळच्या संचालकपदी म्हणून निवडून गेल्या होत्या.