Rashmi Mane
भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपनीपैकी एक असलेल्या BHEL मध्ये आर्टिसन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने वेल्डर, इलेक्ट्रीशियन, टर्नर, मॅकेनिस्ट आणि फिटर अशा आर्टिसन ग्रेड IV पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती देशभरातील उमेदवारांसाठी एक उत्तम संधी ठरणार आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख 16 जुलै 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2025
वेल्डर
इलेक्ट्रीशियन
टर्नर
मॅकेनिस्ट
फिटर
10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
संबंधित ट्रेडमध्ये ITI (NTC) आणि NAC प्रमाणपत्र आवश्यक आहे.
सामान्य आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांनी किमान 60% गुण प्राप्त केलेले असावेत.
SC/ST उमेदवारांसाठी किमान गुण मर्यादा 55% असावी.
आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील उमेदवारांना त्या भागातील भाषा येणे आवश्यक आहे.
इतर भागातील उमेदवारांना हिंदीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आर्टिसन ग्रेड IV पदासाठी मूळ पगार 29,500 - 65,000 दरम्यान असेल. याशिवाय DA, HRA व अन्य भत्ते मिळतील.
या पदांसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय इत्यादी टप्प्यांद्वारे केली जाईल.