Rashmi Mane
जीएसटी कौन्सिलने आरोग्य क्षेत्राशी निगडीत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील 33 जीवनरक्षक औषधांवरील 12% जीएसटी आता पूर्णपणे रद्द!
3 महत्त्वाच्या औषधांवरील 5% जीएसटी कमी करून शून्य केला गेला आहे.
सर्वसाधारण औषधांवरील जीएसटी 12% वरून कमी करून फक्त 5% करण्यात आला आहे.
वैद्यकीय, शस्त्रक्रिया, दंत आणि प्राणीचिकित्सा उपयोगातील मशीन व डायग्नोस्टिक उपकरणांवरील जीएसटी 18% वरून 5% वर करण्यात आला आहे.
वेडिंग गॉज, बँडेज, डायग्नोस्टिक किट्स आणि ग्लूकोमीटर यावर प्रॉडक्टवर जीएसटी 12% ऐवजी फक्त 5% करण्यात आला आहे.
या निर्णयांमुळे औषधे व उपचार यांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे गरीब व मध्यमवर्गीयांसाठी आरोग्यसेवा अधिक किफायतशीर होणार आहे. सरकारचा हा निर्णय आरोग्यदायी आणि निरोगी भारत घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.