Rashmi Mane
ग्रामीण भागातील अनेक मुली शाळेत जाण्यासाठी रोज 2 ते 5 किलोमीटर चालत जातात. खराब रस्ते, उन्हापावसाचा त्रास आणि सुरक्षिततेची चिंता यामुळे मुलींचं शिक्षण अर्धवट राहण्याचा धोका वाढतो.
विशेषतः माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण होण्याआधीच अनेक मुली शाळा सोडतात. या समस्येचा विचार करून महाराष्ट्र शासनाने “राजमाता जिजाऊ सायकल योजना 2025” सुरू केली आहे.
या योजनेतून 5वी ते 12 वीमध्ये शिकत असलेल्या मुलींना मोफत सायकल दिली जाते.
यामुळे त्या सुरक्षित, स्वतंत्र आणि वेळेत शाळेत पोहोचू शकतात. सायकलमुळे मुलींना स्वयंपूर्णता मिळते, नियमित शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित होते.
मुलगी ५वी ते १२वीमध्ये शिकत असावी.
शाळेचा अंतर किमान २ किलोमीटर असावे.
घरचं वार्षिक उत्पन्न ₹1,20,000 पेक्षा कमी असावे.
घरातील फक्त एकच मुलगी योजनेचा लाभ घेऊ शकते.
शासकीय किंवा अनुदानित शाळेत शिक्षण घेत असावी.
BPL किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सदस्य असावा.
यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, सायकलचं बिल आणि शाळेचा दाखला आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून किंवा ऑनलाइन पोर्टलवर फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे जोडा आणि पंचायत समितीमध्ये जमा करा. अधिकारी तपासणी करून DBT मार्गे अनुदान देतील.