Aslam Shanedivan
आज मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटीचे नवे दर लागू होणार असून आता फक्त दोन स्लॅब असणार आहेत.
ज्यात 18 टक्के आणि 5 टक्के असे दोनच स्लॅब असतील. पण त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला.
त्यांनी यावेळी पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताचा नारा देताना जनतेला स्वदेशी वस्तूच खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे.
याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी रोखठोक मुद्दे मांडत थेट प्रश्न विचारले आहेत.
त्यांनी, GST चे नवे दर लागू करणे म्हणजे देर आये दुरुस्त आये अशी गत असल्याचे म्हणत वन नेशन वन टॅक्स अशी घोषणा असताना दोन स्लॅब करण्याची गरज काय होती असा प्रश्न मांडला आहे.
तसेच महागाई नियंत्रण करण्यात सरकारला येत असलेलं अपयश झाकण्याचा प्रयत्न यातून झालाय का? असा संशय व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राष्ट्रात दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय, देशाचे परराष्ट्र संबंधात प्रचंड अस्वस्थता असताना GST चा उत्सव कसा साजरा करायचा
महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, ओल्या दुष्काळाची परिस्थिती, पर राष्ट्र धोरणात अपयश, व्हिजावर निर्बंध, आयटी क्षेत्रावर संकंट आले असताना उत्सव कसा साजरा कारायचा असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत