सरकारनामा ब्यूरो
गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदानाचा अधिकार बजावला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये मतदान केले. यावेळी जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा अधिकार बजवावा, असे अवाहन त्यांनी केले.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी अहमदाबादमधील शिलाज अनुपम शाळेत मतदान केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांनी वयाच्या १०० व्या वर्षीही मतदानाचा हक्का बजावला, त्यांनी रायसन प्राथमिक शाळेत मतदान केले.
पंतप्रधान मोदींचे भाऊ सोमाभाई मोदी यांनी अहमदाबादमधील रानीप येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
भाजपचे उमेदवार हार्दिक पटेल यांनी अहमदाबादमधील चंद्रनगर प्राथमिक शाळेत मतदान केले.
भाजपच्या उमेदवार रिवाबा जडेजा यांनी राजकोटमध्ये मतदान केले. जामनगर उत्तरमधून त्या क्निरिवडणूकीच्या रिंगणात आहेत.
क्रिकेटपटु आणि रिवाबा जडेजा यांचे पती रविंद्र जडेजा यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना मतदान केले.