Jagdish Patil
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या नावाने एक फेक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये, हल्ल्यासाठी तिने पाक लष्कराला जबाबदार ठरवलं आहे.
या पोस्टमध्ये, सध्याच्या परिस्थितीसाठी पाकिस्तानचे जनरल असीम मुनीर यांना जबाबदार धरण्यात आलं आहे.
तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना तेथील नागरिकांविरुद्ध नाही तर पाक सैन्याविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
ही बनावट पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच हानियाने आमिरने स्पष्टीकरण दिलं आहे.
इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत तिने सांगितलं की, सोशल मीडियावर तिच्या नावाने व्हायरल होणाऱ्या पोस्टशी तिचा काहीही संबंध नाही. मी असे कोणतेही विधान केलेले नाही.
तसंच पहलगाममधील हल्ल्यात ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या वेदनांमुळे माझं हृदय तुटलं आहे. हा एक संवेदनशील आणि भावनिक काळ आहे.
अशा वेळी राजकारणाची नव्हे तर सहानुभूतीची गरज आहे. अतिरेक्यांच्या कृती संपूर्ण देशाचे किंवा त्याच्या लोकांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.
तसंच यावेळी तिने पोस्टच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवण्याचं आणि शांततेचं आवाहन केलं आहे आणि चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले.