Rashmi Mane
ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील 'हिमाचल प्रशासनिक सेवेत' अधिकारी आहेत.
ओशिन शर्मा यांना बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या. ते नाकारून त्या हिमाचल प्रशासकीय सेवा (HAS) च्या अधिकारी बनल्या.
ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्या शिमल्यात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्याचे वडील भुवनेश शर्मा नायब तहसीलदार होते.
लहानपणापासूनच घरात शैक्षणिक वातावरण होते. ओशिनला डॉक्टर व्हायचे होते. परंतू त्या महाविद्यालयीन काळात त्या विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाल्या.
ओशिन यांनी पंजाब विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
ओशिन अभ्यासात खूप हुशार होती. ओशिनचा कल पाहून कुटुंबीयांनी त्यांना नागरी सेवा परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर नागरी सेवेत रुजू होण्याचे त्यांचे स्वप्न बनले.
परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली. नागरी सेवेत त्यांची निवड होता होता राहिली. ओशिन शर्मासाठी हा धक्का होता. पण, तिने मेहनत सुरूच ठेवली.
अनेक प्रयत्नांनंतर, शर्मा यांनी 2019 मध्ये हिमाचल प्रशासकीय सेवात (HAS) निवड झाली.