ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली? रिन्यू करण्यासाठी किती खर्च येतो?

Amit Ujagare

परवाना बंधनकारक

प्रत्येक वाहनधारक खिशात परवाना असल्याशिवाय वाहन चालवत नाही, पण दररोज हे लायसन्स तपासलं जात नसल्यानं ते कधीपर्यंत व्हॅलिड आहे याकडं बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं आणि मुदत संपून जाते. पण यामुळं घाबरुन जाण्याची गरज नाही.

Driving Licence | Sarkarnama

मुदत संपल्यांनतर काय?

तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली तरी तुम्हाला ते रिन्यू अर्थात त्याचं नुतनीकरण करता येतं. त्याची प्रक्रिया आणि खर्च जाणून घेऊयात.

Driving Licence | Sarkarnama

खर्च किती?

मुदत संपल्यानंतर ३० दिवसांचा ग्रेस पीरियड असतो, या कालावधीत अतिरिक्त दंड लागत नाही. महाराष्ट्रात आणि देशभरात ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी सामान्य खर्च सुमारे ₹४१६ आहे.⁠

Driving Licence | Sarkarnama

सर्वसाधारण फी :

ग्रेस पीरियड संपेपर्यंत किंवा मुदत संपण्यापूर्वी ₹२०० (रिन्यूअल) + ₹२०० (स्मार्ट कार्ड) = ₹४१६ इतका खर्च येतो. काही ठिकाणी पोस्टल/सर्व्हिस चार्ज थोडा जास्त असू शकतो जो एकूण ₹४००–₹४५० इतका होऊ शकतो.

Driving Licence | Sarkarnama

ग्रेस पीरियडनंतर:

ग्रेस पिरियडनंतर अर्थात ३० दिवसांनंतर ₹१,००० प्रति वर्षे इतकी अतिरिक्त लेट फी लागते. पण १ वर्षाहून अधिक काळ झाल्यास पुन्हा ड्रायव्हिंगची टेस्ट द्वावी लागू शकते त्यासाठी अतिरिक्त ₹३०० फी आकारली जाते.

Driving Licence | Sarkarnama

नवीन लायसन्स

त्याचबरोबर मुदत संपून ५ वर्षांहून अधिक काळ झालेला असल्यास नवीन लायसन्ससाठीच अर्ज करावा लागतो. त्यासाठी नव्यानं लर्निंग लायसन्स आणि सहा महिन्यांत पक्कं लायसन्स अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

Driving Licence | Sarkarnama

ऑनलाइन प्रक्रिया?

sarathi.parivahan.gov.in वर जा... राज्य निवडा...'Driving Licence Related Services' हा पर्याय निवडा, त्यानंतर Apply for DL Renewal हा पर्याय निवडा. त्यामध्ये मुदत संपलेल्या लायसन्सचा क्रमांक आणि जन्मतारीख भरा.

Driving Licence | Sarkarnama

मेडिकल सर्टिफिकेट

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा ज्यामध्ये जुने DL, आधार, फोटो, स्वाक्षरी इ....यामध्ये ४० वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास Form 1A (मेडिकल सर्टिफिकेट) आवश्यक आहे. तसंच फी ऑनलाइन भरा आणि अर्ज सबमिट करा.

Driving Licence | Sarkarnama