अनुराधा धावडे
राहुल गांधी सध्या लडाख दौऱ्यावर आहेत.
राहुल गांधी यांनी आज त्यांच्या KTM 390 Duke बाईकने लेह शहरापासून पॅगाँग तलावापर्यंत राईड केली.
राहुल गांधींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. मी पॅगाँग तलावाकडे जात असल्याचं पोस्टमध्ये म्हटले आहे
विशेष म्हणजे त्यांनी आपले वडिल दिवंगत राजीव गांधी यांची आठवणही शेअर केली आहे.
"माझे वडील म्हणायचे, हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे." इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी लेह, लडाख आणि पंगोंत्सो हे हॅशटॅगही वापरले.
राहुल गांधी 25 ऑगस्टपर्यंत लडाखमध्येच राहणार आहे.
रविवारी, राहुल गांधी त्यांचे दिवंगत वडील राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पॅगाँग तलावावर श्रद्धांजली अर्पण करतील